शिवस्वराज्य फाउंडेशनतर्फे करसोंडा पाड्यात दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप |

Share:

गरजू ग्रामस्थांना दिवाळी फराळ, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपली

पालघर (प्रतिनिधी – ऋषिकेश जाधव) : दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने माकुणसार येथील करसोंडा पाडा येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे, तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

सामाजिक बांधिलकी जपत सण-उत्सवांच्या माध्यमातून गरजू घटकांना मदतीचा हात देणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणे, हा शिवस्वराज्य फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातून फाउंडेशनने सामाजिक कार्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.

या कार्यक्रमाला शिवस्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक भूपेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सौ. निर्मला रुपसरी, यशराज कुडू, अभिषेक म्हात्रे, विराज म्हात्रे, आदित्य म्हात्रे, दर्शना म्हात्रे तसेच करसोंडा पाड्यातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित ग्रामस्थांनी शिवस्वराज्य फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *