राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन |

Share:

लोकभवनात आयोजित सोहळ्याला संपादक भीमराव बालकाबाई हिंदुराव धुळप आणि ओमकार धुळप यांची उपस्थिती; साहित्य, संस्कृती आणि मनोरंजनविषयक विविधांगी साहित्याने विशेषांक सजला

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’च्या २०२६ च्या दिवाळी विशेषांकाचे लोकभवन येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मासिकाचे संपादक भीमराव बालकाबाई हिंदुराव धुळप आणि ओमकार धुळप उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन होणे हा ‘धगधगती मुंबई’च्या प्रवासातील एक महत्त्वाचा आणि गौरवाचा टप्पा मानला जात आहे. अनेक दिवसांचे नियोजन, अथक परिश्रम आणि मेहनतीतून तयार करण्यात आलेल्या या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनामुळे संपादकीय टीममध्ये आनंदाचे वातावरण होते.

साहित्य आणि मनोरंजनाची विविधांगी मेजवानी

या विशेषांकात नामवंत लेखक, पत्रकार आणि कवी यांच्या विविध लेख, कथा आणि साहित्यिक रचनांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय वाचकांसाठी राशिभविष्य, पाककृती, व्यंग्यचित्रे आणि मनोरंजनविषयक साहित्यही प्रकाशित करण्यात आले आहे.

विविध पुस्तक केंद्रांसह एसटी आगारांमध्ये उपलब्ध

संपादक भीमराव धुळप यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाचकांच्या पसंतीस उतरलेला हा दिवाळी विशेषांक दादर येथील आयडियल बुक डेपो, मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे येथील मॅजेस्टिक बुक डेपो तसेच राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर ‘धगधगती मुंबई’चा दिवाळी विशेषांक वाचकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. साहित्य, संस्कृती आणि मनोरंजन अशा विविध विषयांवरील साहित्याचा संगम या विशेषांकात अनुभवायला मिळणार आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *