वेवूर-नवली उड्डाणपुलावर पथदिव्यांसाठी मनसेचा पाठपुरावा |

Share:

अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सुरक्षेचा प्रश्न; रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याचीही मागणी

पालघर : पालघर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या वेवूर-नवली उड्डाणपुलावर अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उड्डाणपुलावर तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी केली आहे.

मनसेकडून संबंधित विभागांकडे तक्रार

मनसेचे पालघर उपशहर अध्यक्ष कार्तिक विलास मैत्राणी यांनी यासंदर्भात संबंधित विभागांकडे तक्रार दाखल केली आहे. उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेत काही व्यक्ती मद्यपान करत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे उड्डाणपुलावर पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मनसेने म्हटले आहे.

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

उड्डाणपुलावर तातडीने पथदिवे बसविण्यासोबतच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना निवेदन

या तक्रारीची प्रत पालघर जिल्हाधिकारी, पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालघर पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे.

नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *