रोलर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन वर्षीय राजनंदिनीची सुवर्ण भरारी!

Share:

मीरा-भाईंदर जिल्हास्तरीय स्पर्धेत स्पीड क्वाड प्रकारात प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पालघर : School Federation of India अंतर्गत आयोजित Roller Athletic Mira-Bhayandar District Championship 2026 या स्केटिंग स्पर्धेत अवघ्या तीन वर्षांच्या राजनंदिनी शुभांगी सुशील नांदवटे हिने स्पीड क्वाड (Speed Quad) प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

ही स्पर्धा १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राजनंदिनीने अंडर-५ (वयोगट २०२२) गटातून सहभाग घेतला होता. अत्यंत कमी वय असूनही तिने मैदानावर आत्मविश्वास, वेग आणि उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन घडविले. संपूर्ण शर्यतीत आघाडी कायम राखत तिने प्रथम क्रमांक मिळविला.

राजनंदिनीच्या खेळातील चपळता, आत्मविश्वास आणि जिद्द पाहून स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक तसेच इतर खेळाडूंचे पालक भारावून गेले. तिच्या उत्कृष्ट खेळाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आणि टाळ्यांच्या गजरात तिला प्रोत्साहन दिले. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीने दाखविलेल्या या खेळाडूवृत्तीने उपस्थितांची मने जिंकली.

राजनंदिनी मागील एक वर्षापासून Zoom Skaters Academy, Palghar येथे प्रशिक्षक राज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रोलर स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाप्रती असलेली तिची आवड यामुळे तिने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती विशेष सराव करणार असून, राज्यस्तरावरही उत्तम कामगिरी करण्याचा तिचा प्रयत्न राहणार आहे.

राजनंदिनीच्या या यशाबद्दल तिचे पालक, प्रशिक्षक राज शर्मा, Zoom Skaters Academy तसेच कुटुंबीयांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. अवघ्या तीन वर्षांच्या वयात स्केटिंग क्षेत्रात तिने मिळविलेल्या यशामुळे पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, राजनंदिनीने यापूर्वी तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. यापुढेही प्रथम क्रमांक मिळवत आपल्या खेळातून सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *