पालघरमध्ये पावसाचे पुनरागमन; भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा |

Share:

मनोर : दोन आठवड्यांहून अधिक काळ विश्रांती घेतल्यानंतर अखेर पालघर जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ

ग्रामीण भागात अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांसह दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घ्यावा लागला.

भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. भात पिकासाठी पावसाची गरज असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *